Top News

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase. Jan 12, 2021
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे दिनांक 12 जानेवारी 2021रोज मंगळवार ला राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापक सतीश पिसे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. "जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी" या म्हणी च्याही सामोरे जाऊन त्यांनी राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांचा त्यांना गाढा अभ्यास होता. आणि तो त्यांनी शिवाजी महाराज यांना त्यांच्या साम्राज्या मधे उपयोग कसा करायचा याचे बाळकडू शिवरायांना माता जिजाबाई कडूनच मिळाले.
त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलतांना अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर सुशील कुमार पाठक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर वृंद यांचे फार मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने