Top News

जादुटोण्याच्या संशयावरून मारहाण प्रकरणी ५ अटकेत. #Beating #arrested


नागभीड तालुक्यातील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोण्याच्या संशयावरून ३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेतील ५ आरोपींना अटक केली आहे. #Beating #arrested

☠️जादूटोणा केल्याच्या संशयावरून लाथाबुक्याने आणि बांबूच्या काठीने मारहाण.

मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान मिंडाळा टोली येथील इंदिराबाई उपासराव कामठे (७०) यांचा मुलगा अशोक कामटे हा जादूटोणा करतो या कारणावरून नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथील प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम व कान्पा येथे राहणारी मयुरीची आई चंद्रकला यादव आत्राम यांनी इंदिराबाई कामटे यांच्या मुलीला घरी जाऊन हात बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर पिल्ला आत्राम व प्रमोद सडमाके यांनी अशोक कामटे याला नागभीड येथून त्याचे मोटारसायकलने मिंडाळा येथे जबदस्तीने आणून निकेश सडमाके याचे घरासमोरील असलेल्या पाण्याच्या टाकेचे लोखंडी ॲगलला दोरीने बांधून बॅट व बांबूचे काठीने मारून जखमी केले. तर इंदिराबाई उपासराव कामठे हिला सोडवायला गेल्यावर काठीने मारून जखमी केले. मंगळवारी सदर घटनेबाबत आरोपीचे विरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने इंदिराबाई कामटे पोलीस स्टेशनला येऊ शकल्या नाहीत.
तेव्हा मुलगी यशोधासह सर्व आरोपींवर कारवाई होण्याकरिता पोलीस स्टेशन नागभीड येथे येऊन तोंडी तक्रारीवरून गुन्हा दाखल घेतला. दरम्यान पोलिसांनी या घटनेतील ५ आरोपींना अटक केली आहे. सद्या गावात शांतता आहे. घटनास्थळास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली. जखमी तिघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने