Top News

32 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू! #Snakebite #snake #snakenews


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी येथील तेली समाज संघटनेचे संघटक संदीप लालाजी शेट्ये वय 32 वर्ष यांचा आज सकाळी अकस्मात निधन झाले. सदर युवकाला काल शेतात सापाने चावा घेतल्यामुळे संदीपचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. #Snakebite #snake
संदीप दिवसभर शेतातील काम करून सायंकाळी घरी आले असता रात्री 8 वाजता त्यांना वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर सकाळी 6 वाजता कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यानंतर संदीप ला प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली ला गाडी साठी संपर्क करण्यात आला परंतु रुग्णवाहिका पोहचण्याआधीच संदीपचा मृत्यू झाला. नेमके मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. #snakenews #Adharnewsnetwork
या प्रकरणी सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे. या युवकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने