Top News

विद्यापीठाने पी.एच.डी (PHD) प्रवेश परिक्षेचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवावी:- सुरज पेदुलवार, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष. #Chandrapur #Gadchiroli


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोनामुळे सध्या विविध समस्या निर्मान झाल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे विद्यार्थानां अनेक अडचनिंचा सामना करावा लागत आहे. तरी विद्यार्थांसमोरील समस्या मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचने नुसार सुरज पेदुलवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुरू समोर निवेदना व्दारे मांडले. #Chandrapur #Gadchiroli
गोंडवाना विद्यापिठाने नुकतेच पि.एच.डी साठी आवश्यक असलेली प्रवेश परिक्षा पी.ई.टी (PET) जाहीर केली. त्यामध्ये 55 टक्के गुणांसह पद्व्युत्तर परिक्षा उत्तीर्ण असलेली उमेदवार सदर परिक्षेला पात्र ठरतिल असे नमुद केले आहे. मात्र कोविडमुळे पद्व्युत्तर अभ्यासक्रमाची अखेरच्या सत्राची परिक्षा ही लांबणीवर गेली आहे. विद्यापिठाच्या नियोजन पत्रानुसार ही परिक्षा 10 ॲागस्ट पासुन होणार आहे. परंतु कोविड परिस्थिती नसती तर तिच परिक्षा मार्च/एप्रिल महीण्यात झाली असती व संबधीत विद्यार्थी हे PET साठी पात्र ठरले असते. कोविड परिस्थितीमुळे परिक्षा पुढे जाने यात विद्यार्थांचा काय गुन्हा आहे?
सदर विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापिठाने पद्व्युत्तर शेवटच्या सत्राला असलेल्या विद्यार्थांना PET परिक्षा देण्याची संधी देण्यात यावी. किंवा PET परिक्षा सप्टेंबर महीण्यात घ्यावी अशी मागणी सुरज पेदुलवार भाजपा जिल्हाउपाध्यक्ष यांनी निवेदना द्वारे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने