Sudhir Mungantiwar: चंद्रपूरातील गुंडाराज, माफियाराज संपवून विकासाला साथ द्या!

भर पावसात वरोरा येथील सभेत मुनगंटीवार यांनी मागितला मतरूपी आशिर्वाद!
चंद्रपूर:- मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी वरोरा येथे मुनगंटीवार यांनी भर पावसात घेतलेली प्रचार सभेची चांगलीच चर्चा होत आहे. या सभेत भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपण या क्षेत्राचे आमदार नसूनही वरोरा येथे कामे केली. "ये तो सिर्फ टेलर है अगर मैं लोकसभा जाता हूं तो शोले से ज्यादा हिट फिल्म दिये बिना नहीं रहुंगा." असे आश्वासन देत उपस्थितांची मने जिंकली. या प्रचार सभेत पुढे बोलतांना ते म्हणाले की, ही "देशी" ची नाही ही "देशा" ची लढाई आहे.


 विकासाला शो करून बोलून मते मागायला हवी, दोन वर्ष आठ महिने सत्तेत असणाऱ्यांनी विकासावर न बोलता मोठी रक्कम देऊन आणलेल्या सोशल मीडियाचा वापर करून जनतेची दिशाभूल करीत असाल तर मतदार घरचा रस्ता दाखवतील. महाराष्ट्रातील सगळ्यात उत्तम तिन सिंथेटिक ट्रॅक चंद्रपूर जिल्ह्यात आहे, ते आपण आणले आहेत. सिंचन प्रकल्प, मामा तलावासाठी १४० कोटी रूपये दिले, असे अनेक विकासाचे कार्य आपण केली आहेत. एका दारू दुकानाचे सतरा दुकाने करणे म्हणजे विकास नव्हे. देशाच्या विकासासाठी मत द्या, निर्णय तुमचा आहे. गुंडाराज, माफियाराज संपवायचा आहे असे आवाहन यावेळी उपस्थितांना भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वरोरा येथील ग्रामीण व शहरी भागातील आनंदवन, सालोरी, मेसा, शेगांव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारव्‍हा, वडगांव, नागरी, गौळ, मुरदगांव, वाघनख, केळी, माढेळी सह अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या व विकास कामे सांगून मतांचा आशिर्वाद मागितला.


नुकतेचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा झाली या सभेत मुनगंटीवार यांच्या भाषणाची आपल्या सोयीनुसार व्हिडिओ कापून काॉंग्रेसच्या होत असलेल्या अपप्रचाराचा सर्वत्र निंदा होत आहे. वरोरा येथील सभेमध्ये मतदारांना संबोधित करीत "गुंडाराज-माफियाराज" संपविण्याच्या केलेल्या आवाहनाला मतदारांनी दिलेला प्रतिसाद व भर पावसात झालेली वरोरा येथील सभेची सर्वत्र चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या