Top News

श्री. माता महाकाली क्रिडा महोत्सव-२०२३ #chandrapur #Netball


नेटबॉल स्पर्धेत कोल सिटी (COAL CITY) विजेता


चंद्रपूर:- द डिस्ट्रिक्ट अथेलेटिक संघटना यांच्या सहकार्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री. माता महाकाली क्रिडा महोत्सव-२०२३ चे आयोजन चंद्रपूर शहरातील विविध भागात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.यात नेटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे दि. २५, २६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले. यामध्ये कोल सिटी (COAL CITY) विजेता ठरली. द. नेटबॉल असोसिएशन चंद्रपूर यांचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला.

प्रशिक्षक म्हणून प्रा. विक्की पेटकर तर खेळाडू म्हणून नरेंद्र चंदेल, चेतन इदगुरवार, नितीन घरट, सचिन वाघाडे, प्रतिक हुसे, शुभम लोखंडे, निखिल कोंडेकर, दुष्यांत चन्ने, जितेंद्र चौधरी, अनुप झाडे यांनी विजयश्री खेचून आणण्याकरिता आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विजेता संघात भैरव दिवसे, सिध्दांत निमसरकार, राजेश हजारे, यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने