महाराष्ट्र संघातील खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीला


राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक
चंद्रपूर:- (भैरव ध. दिवसे)
सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आर) 4थी सिनिअर व 4थी ज्युनिअर राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन 30 सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूल, बंगलोर दक्षिण कर्नाटक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविले होते.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारे पल्लवी गेडाम, पौर्णिमा गुरनुले, वैष्णवी कुनघाडकर, आवेज शेख, भैरव दिवसे (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर) यांनी दि. १५ ऑक्टोंबरला चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हा संघटन महामंत्री मिथिलेश पाण्डेय, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महिला आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, यश बांगडे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडु, चेतनसिंह गौर यांनी सुद्धा खेळाडूंचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत