Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भैरव दिवसे यांचा उत्कृष्ठ पत्रकार (डिजिटल मीडिया) म्हणून होणार सत्कार chandrapur


५ मार्चला चंद्रपूर येथे होणार सत्कार


चंद्रपूर:- माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्युज यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित वर्धापण दिन व महाराष्ट्र रत्न गौरव सत्कार सोहळ्यात पोंभुर्णा तालुक्यातील युवा पत्रकार भैरव धनराज दिवसे यांचा उत्कृष्ठ पत्रकार (डिजिटल मीडिया) म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. दि. ५ मार्च २०२३ ला कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कार्यक्रम होणार आहे.

वाचा कोण आहेत सत्कारमूर्ती
👇👇👇👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे रहिवासी असून त्यांनी आधार न्युज नेटवर्क ची निर्मिती ४ एप्रिल २०२० ला करुन अल्पावधीतच लोकप्रिय पोर्टल झाले आहे. आताच्या घडीला १,१७,३०,१४६ वाचकांची संख्या आहे.


भैरव धनराज दिवसे हे आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आहेत. तसेस दैनिक चंद्रपूर समाचार पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी काम करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार भैरव दिवसे यांचा उत्कृष्ठ पत्रकार (डिजिटल मीडिया) म्हणून सत्कार होणार आहे. सत्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल आई-वडील, गुरुवर्य, परीवार, तसेच मित्रपरिवार यांनी भैरवचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत