Top News

दोस्ती, मैत्री, यारी अन् बरंच काही! रक्ताच्या नात्यापलीकडच्या हळव्या बंधाची #Chandrapur #article

✍️भैरव धनराज दिवसे 

हा लेख आवडला तर खाली दिलेल्या कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य पाठवा... 


​ प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र येत असतात. काही जण छान मित्र आयुष्यभर टिकवतात. तर काहींच्या नशिबात मित्र टिकत नसते. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तसाच एक माझा मित्र, माझा सर्वस्व, माझा सखा... माझा लाडका... त्याच नाव आहे “ मुबारक” "मुबारक शेख" सोबत ओळखी झाली ती म्हणजे सरदार पटेल महाविद्यालयात...‌ मि आणि तो प्रथम वर्षाचे विद्यार्थी... Master of art mass communication करीत असताना ओळख झाली. हळूहळू आम्ही दोघे केव्हा मित्राचे भाऊ बनलो समजलं नाही. माझ्या सुखा दुुःखात सहभागी असणारा हा मुबारक. आपला केव्हा बनून गेला कळलाच नाही.


स्वता:च्या मनाने, स्वता:च्या आवडी-निवडी नुसार वागणारा मुबारक.... तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आणि माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्यापेक्षा वेगळाच असतो, कदाचित प्रत्येकाला आपली ओळख जपता येत नसावी. यासाठी खूप कारण असतात आणि खूप कारण देताही येतात. पण स्वताशी: प्रामाणिक राहणे महत्वाच....! ते मुबारक मध्ये आहे. त्याला नेहमी माहित असतं ती एखादी गोष्ट का करतोय… त्यातून त्याला काय मिळणार आहे आणि समोरच्याला काय मिळणार…. असा काही गोष्टी नक्कीच असतात, ज्या त्या क्षणी घडतात किंवा त्या क्षणी आपण त्या का करतो, याची आपल्याला काहीच कल्पना नसते… त्या नकळत घडत जातात.... अशावेळी आम्ही एकमेकांना एकच सांगतो कि.. "आम्ही जगातील सर्वात आनंदी मित्र आहोत" (we are the most happiest friend in the whole world) प्रत्येक गोष्टीत त्याला मौज, मस्ती,” शोधायची फार आवड आहे. त्यावेळेस मुबारक त्यात एखादा खजिना शोधल्यासारखं वाटत. मुबारक कधी नाराज आणि दु:खी कधीच कुणाला दिसतच नाही! कारण तो कोणाला ते दाखवत नाही, सतत हसतमुख आणि गप्पा मारायला तर विचारू नका.


मैत्रीच्या नात्याला कशाचेही बंधन नसते. मैत्रीचं नातं म्हणजे जगातील एक सुंदर नातं. यात ना वयाची मर्यादा असते, ना सीमेचं बंधन.....

पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल ह्रद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्‍यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो “माणूस” तयार होतो तो खरा मित्र अन् तिच खरी मैत्री!


खरे मित्र असतात ह्रद्याच्या ढासळलेल्या भिंतीना नव्यावे उभे करणारे कारागीर. आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी. मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणास्तोत्र. मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे! किती रुपं या मित्राची असतात.

काही लोक पाण्यात विरघळणाऱ्या साखरेसारखी तर काही पाण्यात विरघळणाऱ्या मिठासारखे असतात! मीठ खारटपणा ठेऊन जात तर साखर गोडपणा! दोन्ही कायम लक्षात राहतात पण एक वाईट म्हणून तर एक चांगल म्हणून! तसा हा माझा मुबारक साखर आहे. त्याचा हा गोडेपणा माझ्या तर गोड आठवण आहे. त्याचा स्वभाव थोडासा वेगळा आहे परंतु, खुप छान आहे. वर्गांमध्ये मला नेहमी मदत करणारा, माझ्या आनंदामध्ये त्याचा आनंद शोधणारा.... मी खचुन गेलो की मला नव्याने उभा करणारा.... हक्काने रागावणारा.... मारणारा असा मित्र हा कुणा नशीब वाल्यालाच मिळू शकते. तसा मला मिळाला. तसं आमच्या दोघात खूप काही गोष्टी कॉमन आहेत. मुबारक आणि मी..... आम्ही दोघेही स्टार आहोत… एकदम सुपरस्टार...! सिनेमातले नव्हे तर real life मधले....
म्हणून आज म्हणावंसं वाटतं, ‘थँक यू मित्रा! मित्र असावा तर असा! तुझ्यासारखी माणसं परमेश्वरानं पुन्हा पुन्हा जन्माला घालावीत.’

आयुष्यातील रक्ताचे नसणारे पण मनाने बांधले गेलेले एक नाते म्हणजे मैत्री. मित्र आपल्या विचारांचा आरसा असतो. एखादा व्यक्ती ओळखीचा असला म्हणजे तो मित्र बनत नाही. मित्र या नात्या पाठीमागे "दो दिल एक जान" अस नात असत. ज्या वेळी आपल्या विचारांची व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तेव्हा ती न कळत आपली मित्र बनुन जाते. मित्र ही खुप मोठी संपत्ती आहे. फार कमी लोकांना जीवाभावाचे मित्र मिळतात. प्रेम आणि मैत्री या तितक्याच वजनाच्या दोन गोष्टी आहेत. असाच एक मला मुबारक शेख सारखा मित्र मिळाल.

मित्राकडून शिवी खाने म्हणजे अमृत प्राशनाचा योग असतो. मित्र ही एकमेव अशी व्यक्ती आहे जीच्याकडून शिवी खाल्यानंतर राग नाही तर हसू येते. एखाद्याशी आपल भांडण असल तरीही कारण नसताना त्याच्याशी नडणारा आपला मित्रच असतो. एका नजरेच्या कटाक्षात चेहरा वाचणारा आपला मित्र असतो. दहादा नाही म्हंटल तरी काय झाल सांग? असा एकच प्रश्न सारखा विचारणारा तो आपला मित्र असतो. मित्र हा आपला असा लॉकर असतो जिथ ब-याचशा वैयक्तिक गोष्टी आपण साठवून ठेवतो.

इतर नात्यांप्रमाणे मैत्री हे सुध्दा रक्ताच्या नात्या इतकच पवित्र नात असत. निखळ मैत्रीमध्ये चुक बरोबर हे काही समजतच नाही. फक्त मित्राच्या पाठीशी उभा राहणे ही एकच भावना मनात असते. एक चांगला मित्र आयुष्यात चांगली दिशा दाखवू शकतो. आपल्या मित्राला योग्य मार्गदर्शन करणे हे चांगल्या मित्राच परम कर्तव्य असत. मित्र हा कर्णासारखा असावा. चुकीच्या गोष्टींना चुक म्हणनारा आणि त्या चुकीच्या गोष्टींना विरोध करणारा, पण निर्णायक क्षणी पाठीशी उभा राहणारा असा मित्र असावा. आयुष्यात मैत्री करताना मित्र म्हणून एक गोष्ट नेहमी सांभाळावी. मित्राचा तोल सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या न कळत आपणहून स्वत:वर घ्यावी. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या पानावरचे किमान दोन शब्द तरी आपण असावे अशी मैत्री असावी.


कवी प्रा. अनंत राऊत मित्र वर कविता लिहितानाते म्हणतात.....

दुःख अडवायला उभऱ्यासारखा ,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १

वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २

आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३

त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४

मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने