Accident News: रस्त्यावरील अवैध पार्किंगने घेतला बळी! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील करंजी एमआयडीसी परिसरात रस्त्यालगत घडली. मनोज बुरेवार (४५) असे मृतकचे नाव असून तो धानापूर येथील रहिवासी आहे. दुचाकीने स्वगावी जात असताना त्यांच्या दुचाकी वाहनाची उभ्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की मनोज यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रस्त्यावर नो -पार्किंगमध्ये उभी असलेली जड वाहने अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. या वेळी संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील 3 तास वाहतूक चक्का जाम केला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करत आहे.