कोणताही अनुभव पाठीशी नसतांना भैरव बनला युवा पत्रकार #chandrapur #bhairavdiwase

Bhairav Diwase
0

चंद्रपूर जिल्ह्यातील उदोन्मुख पत्रकार भैरव दिवसे यांनी सुरू केलेल्या आधार न्यूज नेटवर्कचे वर्धपानदिनानिमीत्त हार्दीक शुभेच्छा!


मीडियाचे तंत्रज्ञान बदलले आहे, आणखी वेगाने ते बदलत आहेत, अशा वेगवान बदलात पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा या एका छोट्याशा गावातला भैरव दिवसे यांनी ४ एप्रिल २०२० आधार न्यूज नेटवर्क तयार करून, जिल्ह्यातील एक ख्यातनाम तत्काळ आणि विश्वसनीय बातमीचे स्त्रोत तयार केले. ही प्रशंसनीय बाब आहे.

भैरव दिवसे हा चंद्रपूर जिल्ह्यातील तुलनेने मागास असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा या छोट्या गावातील तरूण. येथूनच त्यांनी आधार न्यूज नेटवर्क तयार केले. अनेक तालुक्यात प्रतिनिधी तयार करून, त्यांचे मार्फत सशक्त पत्रकारीता सुरू केली. जिल्ह्याच्या मुख्यालयात राहून माध्यमात आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या पत्रकारात एखाद्या ग्रामिण भागातील युवकांनी कोणताही अनुभव पाठीशी नसतांना भैरव सारखा युवा पत्रकार विरळच आहे.

पोर्टल पत्रकारीता अनेकांनी सुरू केली असली तरी, १ करोड २४ लाख वाचकांचा टप्पा गाठणारा आधार न्यूज नेटवर्क हे एकमेव आहे. भैरव दिवसे या तरूणाने बातम्यातील सत्यता ठेवल्यांने त्यांना हे यश मिळाले आहे. भविष्यातील महत्वाचा पत्रकार म्हणून निश्चितच भैरव दिवसे यांचे नाव लौकीक राहील असा मला विश्वास वाटतो.
आधार न्यूज नेटवर्क या नेटवर्कचे संचालक भैरव दिवसे व त्यांचे सर्व सहकारी यांना तिसऱ्या वर्धपानदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

विजय सिध्दावार
संपादक-पब्लिक पंचनामा
अध्यक्ष-व्हाईस ऑफ मीडिया (डिजीटल) चंद्रपूर जिल्हा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)