प्रेमाच्या त्रिकोणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राची हत्या #chandrapur #bandara #murder

Bhairav Diwase
0

पोलिसांकडून दोघे अटकेत, एका अल्पवयीन आरोपीचा समावेश

भंडारा:- एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम असल्याने या प्रेमाच्या त्रिकोणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मित्राला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची घटना भंडाऱ्यात ( Bhandara) घडली. या घटनेने भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. अवेज शेख (वय 19 वर्षे) असं मृताचं नावं असून श्रेयस वाहने (वय 17 वर्षे) असं जखमीचं नावं आहे. तर, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीत तन्वीर पठाण आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. मृत हा मित्रासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याची हत्या केली. 

काय आहे प्रकरण?

नागपूर (Nagpur) इथल्या तन्वीर पठाण आणि भंडारा इथल्या प्रणय कांबळे या दोघांचं एकाच मुलीवर प्रेम होतं. तरुणीचं एकचवेळी दोघांसोबत प्रेमप्रकरण (Love Affair) सुरु असल्याची बाब जेव्हा प्रणय आणि तन्वीर यांना माहित झाली, तेव्हा दोघांमध्ये फोनवर चांगलाच वाद झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी प्रणयने त्याचा मित्र अवेज शेखला भंडाऱ्यात बोलावलं. जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील निहारवाणी गावाच्या मार्गावर तन्वीर आणि त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे आले. मात्र, त्यांच्या भेटीसाठी प्रणय स्वतः न जाता त्याचे मित्र अवेज शेख आणि श्रेयस वाहने हे दोघे गेले. यावेळी चौघांमध्ये चांगलाच वाद झाला आणि त्यात तन्वीरने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अवेज शेखवर सपासप वार केला. यावेळी अवेज हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर, श्रेयस हा मित्र अवेजला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) तन्वीर आणि त्याचा सहकारी अल्पवयीन अशा दोघांना अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)