Top News

पत्रकार भैरव दिवसे यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित #chandrapur #Nashik #Maharashtra


चंद्रपूर:- श्री. कालिका देवी मंदीर संस्थान व क्रीडा संस्कृती फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून पत्रकार भैरव दिवसे यांची निवड करण्यात आली. दि. ५ जानेवारी २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव आनंद खरे, क्रीडा संस्कृती फाउंडेशन सचिव उदय खरे, खजिनदार दीपक निकम, आदींसह राज्यभरातून आलेले सन्मान मूर्ती पत्रकार बांधव उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे रहिवासी असून त्यांनी आधार न्युज नेटवर्क ची निर्मिती ४ एप्रिल २०२० ला करुन अल्पावधीतच लोकप्रिय पोर्टल झाले आहे. आताच्या घडीला १,११,४६,८४४ वाचकांची संख्या आहे.

भैरव धनराज दिवसे हे आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आहेत. तसेस दैनिक चंद्रपूर समाचार पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी काम करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भैरव दिवसे यांची कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल आई-वडील, गुरुवर्य, पत्रकार बंधु, परीवार, मित्रपरिवार व‌ सोशल मीडियाच्या माध्यमातून भैरवला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने