Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून भैरव दिवसे सन्मानित #chandrapur


उत्कृष्ट पत्रकार डिजिटल मीडिया पुरस्कार स्वीकारताना भैरव दिवसे यांचे वडील

चंद्रपूर:- माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च रोजी वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला.

आधार न्युज नेटवर्क न्यूज पोर्टल व युट्युब चॅनल चे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश सकुंडे, अल्पसंख्यांक आयोग (भारत सरकार दिल्ली) तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सौ. शिल्पताई बनपूरकर, संपादक इंडिया न्यूज २४ म.प्र.म.अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला समन्वयक (आंतरराष्ट्रीय मानव अधिकार), सौ.जयश्रीमाई सार्वडेंकर, तुळशीरामजी जांभूळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व शिल्ड देवून सन्मानित करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे रहिवासी असून त्यांनी आधार न्युज नेटवर्क ची निर्मिती ४ एप्रिल २०२० ला करुन अल्पावधीतच लोकप्रिय पोर्टल झाले आहे. आताच्या घडीला १,२१,५४,०८० वाचकांची संख्या आहे.

भैरव धनराज दिवसे हे आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आहेत. तसेस दैनिक चंद्रपूर समाचार पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी काम करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार भैरव धनराज दिवसे यांचा ५ जानेवारीला कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्य पत्रकारीता पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले होते. ५ मार्चला उत्कृष्ठ डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला आहे.

भैरव धनराज दिवसे यांना मिळालेला हा पुरस्कार डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आहे त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदर कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार, माहिती अधिकार व पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना पदाधिकारी तथा पाहुणे उपस्थित होते.

1 टिप्पणी:

  1. भैरव दिवशी सारखा प्रतिभावान विद्यार्थी आम्हाला लाभला याचा आम्हाला अभिमान आहे

    उत्तर द्याहटवा