महिलाराज! मिनाक्षी गेडाम बनली एका दिवसाची ठाणेदार... #Chandrapur #pombhurna #policeपोंभुर्णा:- जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून पोंभुर्णा तालुक्यातील पोलीस ठाण्याची जबाबदारी एका दिवसासाठी महिलांनी सांभाळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. २४ तासांसाठी संपूर्ण महिला पोलीस ठाणे प्रमुख म्हणून काम सांभाळले.


यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील पोलीस ठाण्यात महिला ठाणेदार म्हणून मपोशी मिनाक्षी गेडाम कर्तव्य बजावत आहेत. मपोशी मीनाक्षी गेडाम यांनी आपले कर्तव्य उत्तम रित्या पार पाडल्याने पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोंभुर्णा पोलीस स्टेशनात कर्तव्यावर असणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या