“भैरवचे आधार” चंद्रपूरकरांसह सर्वदूर एक कोटीहून अधिक वाचकांपर्यंत #Adharnewsnetwork


माझे मित्र, जनसंवादशास्त्र विभागातील स्नेही, श्री. भैरवजी दिवसे यांनी महाविद्यालयीन जीवनातूनचं डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातनं सुरू केलेल्या “आधार न्यूज नेटवर्क” पोर्टलला आज ०४ एप्रिल २०२३ रोजी तीन वर्षे पूर्ण होतायत आणि केवळ तीन वर्षांतचं “भैरवचे आधार” चंद्रपूरकरांसह सर्वदूर एक कोटीहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचले, हे अभिनंदनीय आहे.

आज आधाराचे तिसरे वर्धापन!
त्यानिमित्तानं भैरवजी, राहुलजी व त्यांच्या संपुर्ण आधार टीमला माझ्या अनेक शुभेच्छा! 💐💐
आधारने दिवसागणिक वाचकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करून उत्तम लेखनीच्या माध्यमातनं दर्जेदार असे वाचन वाचकांस उपलब्ध करून द्यावे, याशिवाय नियामक मांडणी, रास्तता आणि नेमकेपणा या त्रीसूत्रीने आपला कार्यालेख उंचवावा.. ह्याच सदिच्छा!


- शुभाकांक्षी,
मादेशवार मंगेश
कार्यकारी संपादक, चांदा न्यूज
www.chandanews.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत