Top News

मास्टर ऑफ ऑर्ट माॅस कम्युनिकेशनची डिग्री पुर्ण‌‌‌ केल्याबद्दल अभिनंदन.....भैरव #chandrapur #pombhurna


केवळ गावातील समस्या सोडविण्यासाठी पत्रकारिता सुरू करणारा भैरव. खरं तर मिसरूडही फुटली नव्हती तेव्हापासून तो पत्रकारतेत आपला अध्याय सुरू करतो. कुणी हसतात, कुणी बोलतात, कुणी मत्सकरी करतात पण तो कुणाकडेही लक्ष्य न देता आपली भैरव विद्या (पत्रकारितेची) सर्वांवर आजमावत असतो.तो त्याचा निर्मळ प्रयत्न शतप्रतिशत व तितक्याच विश्वासाने सुरू असतो. आधार न्यूज नेटवर्क हे त्याचे पत्रकारितेचे अस्त्र घेऊन निघालेला एका व्हिजीटर ते आज एक करोड तेहत्तीस लाख वा विजीटर पाहून त्याच्या ताकदीची जाणीव सर्वांना होऊन जाते.

नवीन शिकणारा भैरव तो शांत बसणार नव्हताच पत्रकारीतेच्या क्षेत्रात. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत चंद्रपूरच्या नामवंत काॅलेज सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर जनसंवाद विभागातून त्याने मास्टर ऑफ ऑर्ट माॅस कम्युनीकेशन चे दोन वर्षांच्या पत्रकारितेच्या शिक्षणासाठी तो चंद्रपूरात जातो.या शिक्षणासोबत त्याचं आधार न्यूज नेटवर्क सुरूच होतं.शिक्षण व आधार दोन्ही फेज त्याने छान पैकी सांभाळून घेतलं. आधारची स्पीड झपाट्याने सुरूच होती.यात त्याला पत्रकारितेचं शिक्षण महत्वाचं ठरत होतं.

भैरव दिवसे हा गोंडवाना विद्यापीठाची दोन वर्षांची मास्टर ऑफ माॅस कम्युनीकेशनची डिग्री पुर्ण‌‌‌ केलेला आहे.त्याला ग्रेड गुणक्रमांक ९.०२ प्राप्त झाले आहेत.

...तो यशस्वी पत्रकार बनेल यात अजिबात शंका नाही.

खुप खुप शुभेच्छा भैरव....✍️✍️💐💐

-सुरज गोरंतवार, पोंभुर्णा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने