राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकाविले कांस्य पदक #chandrapur

Bhairav Diwase

सरदार पटेल महाविद्यालयाने खेळाडूंवर केला अभिनंदनाचा वर्षाव
चंद्रपूर:- सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आर) 4th सिनिअर व 4th ज्युनिअर राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन 30 सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूल, बंगलोर दक्षिण कर्नाटक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविले.

सरदार पटेल महाविद्यालयातील पलक शर्मा, पल्लवी गेडाम, निकीता गौरकार, मिनल कृष्णपल्लीवार, पोर्णिमा गुरनुले, प्राची साळवे, साक्षी धंदरे, वैष्णवी कुनघाडकर, धनपाल चनकापुरे, मुबारक शेख, भैरव दिवसे, आवेज शेख यांची महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. कुलदीप गोंड, प्रशिक्षक चेतन इदगुरवार, मयुरी ताई तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरदार पटेल महाविद्यालयातील १२ खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.