Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

शिवसेना नगरसेवक गणेश वासलवार यांच्या नेतृत्वात पोंभुर्ण्यातील शिवसैनिक मातोश्रीवर #Shivsena #pombhurna #chandrapur


पोंभुर्णा:- राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातही मतभेद निर्माण झाले. मात्र चंद्रपूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश वासलवार यांच्या नेतृत्वात २५ शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले. व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक गणेश वासलवार, नगरसेवक बालाजी मेश्राम, किशोर डाखरे, शंकर वाकुडकर उपसरपंच दिघोरी, मुकेश ढूमणे, लोकाजी दावनपेल्लीवार, निकेश देऊरमल्ले, अंकुश मोंगरकार, प्रशांत भुरसे, संदिप पोतराजे, अक्षय ठेंगणे, चैतन्य गव्हारे, अनिल शेंडे, रोहीत मानकर, प्रफुल गव्हारे, किशोर शालीक ठाकरे, आदित्य पोतराजे, यशवंत पिंपळशेंडे, विकास वडस्कर, कैलास पिंपळशेंडे, सुरेंद्र शेडमाके, प्रफुल पिंपळशेंडे, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत