चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. उर्जानगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चक्क ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या.
१० मार्चला उर्जानगर मेजर गेटजवळील 'राजश्री अपार्टमेंट'मध्ये काही लोक अवैधरित्या नोटा तयार करत आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून फ्लॅट नंबर २०३ वर छापा टाकला. हा फ्लॅट बंगाली कॅम्प येथील सुमित पॉल यांचा असून, त्यांनी तो एका महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील लोकांना भाड्याने दिला होता.
या छाप्यात पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे १० बॉक्स, एक एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९१ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर या २६ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या उद्देशाने या नोटा तयार केल्याबद्दल आरोपीविरुद्ध दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रमोद चौगुले उपविपोअधि चंद्रपूर, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. गौरव कायंदेपाटील, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन दुर्गापुर, पो. नि. श्री. अमोल काचोरे, स्थानीक गुन्हे शाखा, सहा. पोलीस निरीक्षक दिपक कांकरेडवार, सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा /२१३८ जयसिंह, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा /२५३५ संतोष येलपूलवार, पोहवा / २४९३ गणेश मोहुर्ले, पोहवा / २५४९ नितीन रायपूरे, पोहवा /२२९६ रजनीकांत पुट्टावार, पो.अं.१२३९/किशोर वकाटे, पोअं/२८७८ अजित शेंडे, चालक पोहवा दिनेश अराडे, प्रमोद डंभारे, महिला पोहवा निराशा तितरे/१५२२, विजयमाला वाघमारे/२३६८, छाया निकोडे/२३५२, अपर्णा मानकर / २८३५, महिला पोअं दिपीका सोडनार/ २४९८, उषा लेडांगे/१२६७ यांनी केली आहे.

