पोंभुर्णाचे भैरव दिवसे यांना कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर #chandrapur

Bhairav Diwase
1
५ जानेवारीला नाशिक येथे होणार सत्कार 


चंद्रपूर:- श्री. कालिका देवी मंदीर संस्थान व क्रीडा संस्कृती फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून पत्रकार भैरव दिवसे यांची निवड करण्यात आली आहे. दि. ५ जानेवारी २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

निडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे रहिवासी असून त्यांनी आधार न्युज नेटवर्क ची निर्मिती ४ एप्रिल २०२० ला करुन अल्पावधीतच लोकप्रिय पोर्टल झाले आहे. आताच्या घडीला १,११,४६,८४४ वाचकांची संख्या आहे. 

भैरव धनराज दिवसे हे आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक आहेत. तसेस दैनिक चंद्रपूर समाचार पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी काम करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भैरव दिवसे यांची कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल आई-वडील, परीवार, तसेच मित्रपरिवार त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा