Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने अ‍ॅडमिनची जीभ कापली #chandrapur #pune #crime


पुणे:- सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याचा राग मनात ठेऊन पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीत भागातील ओम हाईट्स या सोसायटीमध्ये हा प्रकार 28 नोव्हेंबर रोजी घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्या एका रहिवाशाने 'ओम हाईट्स ऑपरेशन' या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये सोसायटीमधील सर्व सदस्य होते. मात्र काही कारणास्त आरोपीला या ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले होते. हाच रागा मनात ठेवून आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याची जीभ कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते जखमी झाले आहेत.

 दरम्यान, या प्रकरणी पिडीत ग्रुप अ‍ॅडमिने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत