Top News

आमचा सत्कार म्हणजे गावाचा सत्कार; कार्यक्रमात मान्यवरांचा सूर #pombhurna


जि.प.उ.प्रा.शाळा चेक आष्टा येथे माजी विद्यार्थी मेळावा व सर्व बॅचचा अमृत महोत्सव साजरा
पोंभुर्णा:- शाळा ही ज्ञानार्जनाचे केंद्र आहे. त्याला ज्ञान मंदिर म्हणतात. आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग आपल्या शाळेत घालवतो, ज्यामध्ये आपण अनेक विषयांचे शिक्षण घेतो. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वेळ आमच्या शाळेत घालवतो. आमच्या शाळेशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा खूप महत्वाची आहे. त्याकरीता दि. ३० ऑक्टोबरला माझी शाळा, माझा सन्मान, माझा अभिमान अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा तथा माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी विद्यार्थी मेळावा व सर्व बॅचचा अमृत महोत्सव स्नेहबंध २०२२ उत्सव आपल्या मातीचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा चे प्रांगणात सतीश वाढई यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला.शाळा निर्माण झाल्यापासून चा हा कार्यक्रम प्रथमच असल्याने ढोल तशाच्या गजरात गावात प्रभातफेरी काढून आनंद महोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त एस. टी. वाहक मोरेश्वर कुसराम, उद्घाटन सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका शांताबाई कारेकार,प्रमुख पाहुणे प्रदिप दिवसे, पोलिस पाटील भाऊराव पिंपळशेंडे,ग्रा.वि.अधिकारी सुरेश वाढई, रवी येरमे (जे. सहा.), भुजंग कुळमेथे (अभियंता ), अशोक कुळमेथे ( अभियंता ), विलास निखाडे (एस. टी.वाहक), परशुराम पेंदोर (कृषी सहाय्यक),कांताबाई मडावी(सरपंच) जगन येलके(उपसरपंच) तसेच माजी विद्यार्थी, सत्कारमूर्ती मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व माल्यार्पण व मान्यवरांच्या स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्तीचे सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोगुलवार तर प्रास्ताविक व आभार सतिश वाढई यांनी केले. यावेळी गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती मोरेश्वर कुसराम, शांताबाई कारेकार, प्रदिप दिवसे, भाऊराव पिंपळशेंडे, सुरेश वाढई, रवी येरमे, भुजंग कुळमेथे, अशोक कुळमेथे, सतिश वाढई विलास निखाडे, रघूनाथ कुंभरे, तेजराव दिवसे, सत्यपाल येरमे, भाऊजी गेडाम, जितेंद्र पिंपळशेंडे, जयंत पिंपळशेंडे गोपाळ कुसराम, भैरव दिवसे, मन्सराम कुळमेथे, संतोष बोंडे, नारायण गेडाम, परशुराम गेडाम, जगन येलके, जानकिराम गेडाम, सुरेश मडावी, दिवाकर कुळमेथे, गिरमाजी कुंभरे, शामसुंदर कुसराम, ताराचंद कुंभरे, दिनेश गेडाम, यामावार, पोगुरवार, शिंगाडे, महेश्वरी वाढई, सुनीता ढुमणे, शामला मडावी, सविता मडपती,ताराचंद कुंभरे,कांताबाई मडावी, भारती येरमे, सिंधूबाई पिंपळकर,समीक्षा मेश्राम,रघुनाथ मांडवगडे तसेच मंचावर उपस्थित सत्कारमूर्तीना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून गावातील होतकरू मुलांना नोकरी करिता मार्गदर्शन, वाचनालय, हुशार विध्यार्थ्यांना मदत, व तसेच गावातील मुलांना अधिकारी बनविण्याचा संकल्प मंचावर करण्यात आला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मंचावर बसलेली सर्व सत्कार मूर्तिना एकत्र आणून भेटीगाठी व जुन्या आठवणींना उजाळा देणे, व मुलांमध्ये आदर्श निर्माण करणे होता.यावेळी आनंद कुळमेथे (से. पो.) यांना व्हाटसप कॉल च्या माध्यमातून सर्वांशी हितगुज करता आली.त्यामुळे प्रेरित होऊन सर्वांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने