पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी "या" तारखेला चंद्रपूरात #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
0
महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा


चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार सुरू केला आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी चंद्रपुरात निवडणूक सभेला संबोधित करून महायुतीच्या उमेदवारासाठी जनतेचा पाठिंबा मागणार आहेत.


पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर भाजपने तयारी सुरू केली आहे. याबाबत गुरुवारी भाजपच्या नियोजन समितीची बैठक झाली. ज्यामध्ये सभेच्या ठिकाणासह तयारीबाबत चर्चा झाली. नियोजन समितीची बैठक झाली असून सभेच्या स्थळाचे नियोजन मोरवा विमानतळाच्या बाजूला करण्यात येणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे.


सभेसाठी किमान पाच ते सात हजार वाहने ग्रामीण भागातून येणार असल्याने वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तथा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. भाजप कार्यकर्तेदेखील सभास्थळ पाहून आलेत.


#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)