Bachchu Kadu: WCL च्या मनमानी कारभाराविरोधात बच्चू कडू आक्रमक

Bhairav Diwase
खदान बंद पाडण्याचा दिला इशारा!

चंद्रपूर:- संवाद आणि संवेदना संपलेल्या WCL ला वटनीवर आणण्यासाठी आमदार बच्चू कडू आता आक्रमक झाले आहेत. रोजगार नाही, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, ना पुनर्वसन, ना मोबदला... पण स्थानिकांवर प्रदूषणाचा बळजबरीने बडगा उगारणाऱ्या WCL चा आता मात्र हिशोब चुकता केला जाणार आहे. Bachchu Kadu 


ज्या पद्धतीने अफजलखान नुकसान करत होता, त्याच पद्धतीने WCL वागतंय, असा गंभीर आरोप करत बच्चू कडू यांनी खदान बंद पाडण्याचा इशारा दिलाय. येत्या दोन-तीन महिन्यांत चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूरमधील एक ते दीड लाख लोकांना एकत्र करून एकही कोळशाचा कण बाहेर जाऊ देणार नाही, असा एल्गार पुकारण्यात आलाय. उद्योग चालू करायचा असेल तर करा, पण आमच्या हक्कावर घाला घालाल तर छतावर पाय ठेवू, असा सज्जड दम भरत बच्चू कडू यांनी आता थेट महा-आंदोलनाची हाक दिली आहे. WCL Chandrapur