पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा हे छोटेसे गाव या गावात एक विस बाविस वर्षाचा मुलगा तालुक्यातील ठिकाणी शिक्षण घेत होता शिक्षण घेत असताना त्याला आपण पत्रकार बनावं असं वाटायचं त्याने मोबाईल च्या युगात आँनलाईन बातम्या पाठवणार्या आधार न्युज नेटवर्क पोर्टल सुरू केले व आपल्या परिसरातील बातम्या तो त्या पोर्टल ला देऊ लागला त्याची ओळख तालुक्यातील काना कोपऱ्यात एक पत्रकार म्हणून होऊ लागली.
अशातच कोरोणा महामारी आली या महामारीने देशातच नव्हे तर जगभरात हाहाकार माजवला सर्व बंद झाल लोक घरातुन बाहेर पडु शकत नव्हते दैनिक वर्तमानपत्र बंद पडले आता बातम्या कश्या प्रकारे मिळतील याच आशेत वाचक होते न्युज चॅनलवर जगभरातील बातम्या येत होत्या पण् गावखेळ्यातील बातम्या साठी मोबाईल आधार झाला अन् न्युज नेटवर्क हा या काळात नावारुपाला आला अन् भैरव दिवसे हा पत्रकार म्हणून पुढे आला.
कोरोणा काळात भैरव हा कोरोनाची कोणतीही भिती न बाळगता बातम्या संकलन करु लागला व लोकांना तो वाचायला भाग पडु लागला. त्यांच्या सोबत त्याचे अनेक सहकारी साथ होतेच पण पोंभुर्णा येथील जेष्ठ पत्रकार मंडळीच त्याला मार्गदर्शन होतंच होत.भैरव कमी वयाचा असल्याने त्याच्यात परिपक्वता आलेली नव्हती तरी पण् त्याची जिद्द होती मला एक दिवस मोठा पत्रकार बनायचं आहे.काही ना भैरव चा त्रास व्हायचा काही लोक त्याला कापी पेस्ट पत्रकार म्हणायचे तर काही वाट्सअप पत्रकार या सर्व लोकांकडे ते दुर्लक्ष करित पुढे चालत राहिला.
चंद्रपूर समाचार या वर्तमानपत्रात त्याने तालुका प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले व ज्यांनी त्याला निगेटिव्ह बोलले त्यांच्यासाठी एक चपराक होती काही दिवसांपूर्वी भैरव च्या आधार न्युज नेटवर्क ने एक कोटी चा टप्पा पार केला जिल्ह्यातील त्याच पहिलं पोर्टल असावं कदाचित.कमी वयाचा पत्रकार म्हणून भैरव चा अभिमान असायला पाहिजे त्याचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.
भैरव ने अनेक जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन आपल्या आधार न्युज नेटवर्क मध्ये आवाज उठवला त्यामुळे लोकांना न्याय मिळु लागला त्यामुळे तो जनसामान्यांसाठी आधार ठरला. आता भैरव ला मानाचा कै.कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याची बातमी बघितली छान वाटलं भैरव असाच तुझ्या प्रगतीचा आलेख चढता ठेव यानंतर ही पुढे जाऊन नामांकित न्युज चॅनलवर दिसावा हिच माझ्याकडून शुभेच्छा 💐💐💐💐👍
अविनाश वाळके
अभिनंदन
उत्तर द्याहटवाअभिनंदन भैरव....यापेक्षाही उज्वल यश संपादन करावे.
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवाAbhinandan Great work all the best
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा