वनविभागाने केले ताटवा भरलेले वाहन जप्त #chandrapur

Bhairav Diwase
0

जप्तीनामा देण्याची वाहन चालकाची मागणी


चंद्रपुर:- चंद्रपुर वनविभागा अंतर्गत वणाधिकाऱ्यांनी शहरातील जनता कॉलेज जवळील परिसरात ताटवा भरलेला मिनी ट्रक पकडला दरम्यान वाहन चालक व सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली व परवान्यांचे सर्व कागदपत्रे दाखवली असतानाही वाहन जबरदस्तीने रामबाग परिसरात लावण्यास भाग पाडले.

सदर कारवाई दिनांक 3 जानेवारीला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान करण्यात आली परंतु आज दिनांक 4 जानेवारी 1 पर्यंत ही वाहन चालकाला जप्तीनामा किंव्हा इतर कारवाईची काहीही माहिती देण्यात आली नाही, आणि वाहन रामबाग परिसरात जप्त आहे या दरम्यान या वाहनात काही अनुचित प्रकार घडला त्याचे संशय माझेवरच घेण्यात येणार असा आरोप वाहन मालक साबीर खान पठाण यांनी केला आहे.

बांबू पासून तयार करण्यात आलेले ताटवे जुनोना ते वरोरा जात असतांना गोपनीय माहिती च्या आधारे वनविभागाच्या आर.ओ. राजेंद्र पथाडे, बाबूपेठ बिट चे वनरक्षक प्रदीप कोडापे व जुनोना बिट चे वनरक्षक संदीप पारवे यांनी कारवाई करत MH 34 T 1038 आयशर वाहन जप्त केले, यात त्यांनी वाहनचालकाला वाहन रामबाग परिसरात लावण्यास लावले परंतु जप्त वाहनाचा जप्तीनामा वाहनचालकाला दिला नाही, रात्रो उशिरापर्यंत जप्ती कारवाईची कागदपत्रे देण्यात यावी अशी मागणी वाहनचालकाने केली परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आज दुपारपर्यंत ही जप्तीनामा वाहनचालकाला देण्यात आला नाही करिता आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी वाहनचालक साबीर खान पठाण यांनी केला आहे.

ग्रामीण भागात बुरुड समाजातील नागरिकांना उदरनिर्वाहाकरिता कार्ड वितरित करून परवानगी देण्यात येते त्याद्वारे ग्रामस्थांना बांबू पासून ताटवे, सुपले, टोपले बनवण्याची सवलत देण्यात येते करिता ग्रामस्थांनी तयार केलेले साहित्य विक्री ची परवानगी देण्यात आली आहे या माध्यमातून ग्रामस्थांच्या साहित्याला बाजारपेठ उपलब्ध होते व त्याचा मोबदला ग्रामस्थांना मिळतो.

गोपनीय माहितीच्या आधारे बांबू पासून निर्मिती वस्तूची वाहतूक होत असल्याच्या आधारे कारवाई करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे, पुढील कारवाई सुरू आहे
आर.ए. कारेकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपुर (प्रादेशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)