भैरव दिवसेचा पोंभूर्णा भाजपा तर्फे सत्कार #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

राष्ट्रीय सेस्टो बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकाविले कांस्यपदक

बंगलोर येथे झाली राष्ट्रीय स्पर्धा; महाराष्ट्र टिमला मिळाले कांस्यपदक

पोंभूर्णा :- तालुक्यातील चेक आष्टा येथील युवकांने क्रिडाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने भाजपा पोंभूर्णाच्या वतीने त्याचे सत्कार करण्यात आले. पोंभुर्णा तालूक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे याने बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कास्यपदक जिकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये होता. यात महाराष्ट्र टिमने कांस्यपदक पटकावले.


सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आर) ४ थी सिनिअर व ४ थी ज्युनिअर राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन ३० सप्टेंबर २०२२ ते ०२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूल, बंगलोर दक्षिण कर्नाटक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविले होते. यात भैरव दिवसेंचा समावेश होता. भैरवने क्रिडा क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा च्या वतीने शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अल्का आत्राम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी उपसभापती विनोद देशमुख, शहर अध्यक्ष ऋषी कोटरंगे,महामंत्री हरीश ढवस,महामंत्री ओमदेव पाल , नगरसेवक संजय कोडापे, धनराज दिवसे, श्रीकांत वडस्कर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)