Top News

निडर भैरवच्या निर्भिड पत्रकारीतेचा ओनामा.

माझ्या बद्दल २०२१ ला पत्रकार सुरज गोरंतवार पोंभूर्णा यांनी लिहिलेला लेख.... एकदा वाचून बघा..... माझ्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित करण्यात आला होता... १९ जुन २०२१ ला....*


भैरव धनराज दिवसे हे नाव आता पोंभूर्णा पत्रकारीतेत एक परिचयाचे नाव झाले आहे. नव्हे तो पोंभूर्णा तालुक्यालाच परिचयाचा झाला आहे. जेमतेम २०वं वर्ष पार केलेला भैरव मागील एक वर्षापासून आधार न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून पत्रकारीतेत सक्रीय झाला. त्याला सहकार्यही खुप लोकांचे लाभले. याला कारणीभूत तोच व त्याच्यातील शिकण्याची जिद्द. म्हणूनच अनेकांचा त्याला "आधार" मिळाला. हि घोडदौड सुरू करण्यासाठी किंवा पत्रकारीतेत बोट धरून ज्यांनी आणलं ते म्हणजे आमचे पत्रकार मित्र व दैनिक तरूण भारत वृत्तपत्राचे पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी दिलीप मॅकलवार यांनीच. दिलीप मॅकलवार सरांनी पहिल्यांदा भैरवच्या अंगी असलेलं टॅलेंट ओळखलं आणि बातम्या लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. आणि मिसरूडही न फुटलेल्या वयात भैरवची पत्रकारीतेत एन्ट्री झाली. सुरूवातीला भिती होती खरी, पण निडर असलेल्या भैरवच्या भितीचा बाऊ फार जास्त काळ अडून राहिला नाही.
    गावातील समस्यांपासून त्यांनी आपल्या बातम्याची पहिली सुरूवात केली. हळूहळू आजुबाजुच्या गावातून, शहरातून, बातम्या पोर्टलवर सुरू झाल्या. आणि तो हळूहळू तालुक्यात परिचीत झाला.  
     
      तो प्रत्येक राजकीय पक्षातील स्थानिक नेत्यांशी त्याचे फार चांगले संबंध आहेत. व ते प्रत्येकच भैरवला आपलंसा समजतात हि मिळकत फार कमी लोकांना मिळते. 
त्याचे राजकीय प्रेरणास्थान व राजकीय मार्गदर्शक  बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे आहेत. सुधीरभाऊच्या विकास कामांच्या झंझावातानेच भैरवला सुधीर भाऊ आपले आईडल वाटतात. आणि यामुळेच तो पुर्ण विश्वासानेच भारतीय जनता पार्टीशी संलग्न झाला. 
स्थानिक नेत्यांमध्ये भैरवला आकर्षीत केलेले व्यक्तीमत्व म्हणजे देवाडा-केमारा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य राहूलभाऊ संतोषवार आहेत. भैरव राजकीय नायक म्हणून राहुलभाऊ संतोषवार यांना मानतो. पोंभूर्ण्यात राहुलभाऊचे सेवाकार्य खरं तर अनेकांना भुरळ घातलेला आहे यातून भैरव कसा सुटणार. 
खरं तर भैरवच्या  "आधारचं" बिराड असं सहज काही चालू लागलं नव्हतं.  भैरव हा पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा या छोट्याशा गावचा. शेतकरी कुटुंबात जन्मलेला, वाढलेला. त्याला गावातील समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या या समस्या त्यांनी खुप जवळून पाहिलेला असल्याने. आणि असे समस्या तो वृत्तपत्रात बघत असल्यानेच तो त्याच्या वृत्त वाचण्यातूनच अप्रत्यक्षरित्या पत्रकारतेशी जुळत गेला. पण यात प्रत्यक्ष  जुळायचे कसे, समस्या मांडायचे कसे असले प्रश्न  त्याला नक्कीच पडले. मात्र काही तरी मिळवण्याची जिद्द यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या लोकांशी तो संपर्क साधू लागला. अणि त्यांनी तरूण भारतचे पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी व भाजपाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॅकलवार सरांनी त्याला मदत केली. आणि भैरवचं  पत्रकारीतेतला अध्याय सुरू झाला.
       आणि यातूनच आधार न्यूज नेटवर्कचे पाऊले उचलली गेली. खरी पण आर्थीक चणचण असल्याने  आधारचं स्वप्न पुढे ढकलल्या जावू लागलं. अश्यात आधारला मदत मिळाली ती आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हा परिषद सदस्य राहुलभाऊ संतोषवार, पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे यांचं मिळालं. काही विभूतींनीही अप्रत्यक्षरित्या मदत करून आधारची विट रचली.
आज आधार न्यूज नेटवर्कचं काम  तालुक्यात यशस्वीपणे सुरू आहे. आधार नेटवर्कने ४३ लक्ष वाचकांचा टप्पा पुर्ण केलेला आहे.
आजमितीला आधार सोबत १० सुशिक्षित व निडर पत्रकारांची साथ आहे. आणि ॲड. राहुल थोरात सारखा जाणता पत्रकार उपसंपादक म्हणूनही साथीला आहे. भैरव नेहमी बोलतांना म्हणतो की १ कोटी वाचकांपर्यंत आधार पोहचलं तर आपल्या कामाचं चिज होईल. हा विश्र्वास नक्कीच सार्थकी लागेल यात शंका नसणार आहे.
 भैरव पत्रकारितेसोबतच काॅर्मसचं शिक्षण पुर्ण केले. तो पोंभूर्णा चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विद्यार्थी होता. भैरवला वकृत्व कला खुप मस्त जमतेय. तो शालेय स्पर्धेत भाग घेतो. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. आता भैरव सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे Master of art mass communication चं शिक्षण घेत आहे.
      भैरव आपल्या शालेय शिक्षणात पत्रकारितेची सळमिसळ करित नाही. म्हणूनच तो आपलंसं वाटतो. तो प्रत्येक फ्रेम मध्ये आपलं वेगळेपणा जपून असतो.
     जनसामान्यांच्या हितासाठी... जनमानसांच्या हक्कासाठी... चं आधारचं वटवृक्ष अधिकाधिक मोठं होतं राहो हिच यावेळी सदिच्छा....

पत्रकार सुरज गोरंतवार पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने