कोरपना:- कोरपना तालुक्यातील धोपटाळा (पारधीगुडा) येथे एन होळीच्या मध्यरात्री पत्नीने स्वतःच्या पतीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ही बाब समोर आली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पती व पत्नी यांच्यात अनेक दिवसापासून वाद-विवाद सुरू होता. आरोपी महिलेचे अनेक दिवसापासून एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. अंदाजे आठ महिन्यापूर्वी ही महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. पुन्हा परत एक महिना पूर्वीच पतीकडे परत आल्याची माहिती गावकरी यांच्याकडून मिळाली. असे असताना येथील एका व्यक्तीने या दोघांना पळून जाण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप मृतकाचा लहान भावाने केला आहे. मात्र तो व्यक्ती कोण? याचा तपास केल्यास सत्य बाहेर येऊ शकते असे मत व्यक्त होत आहे.
ज्यादिवशी हे हत्याकांड घडले त्या रात्री आरोपी महिलाचा "तो" प्रियकर एकटाच रात्रभर गावा लगतच्या शेतात दळून बसला होता आणि तो दुसऱ्या दिवशी "तो" गावात आला. सदर संशयास्पद बाब मृतकांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली व कोरपना पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास कोरपना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे करीत आहे.