चंद्रपूर:- चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच कढोली बुज येथे उत्साहात पार पडले. 'विकसित भारत करिता युवाशक्ती' या संकल्पनेवर आधारित या शिबिरातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.
राजुरा तालुक्यातील कढोली (बु.) येथे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा पाळत उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असला, तरी शिबिरातील उपक्रम जोमाने राबवण्यात आले.
शिबिरादरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सैनिकी स्कूलचे मनोदिप ठाकूर यांनी 'रा.से.यो. एक संधी' यावर तर उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी 'विकसित भारत करिता युवाशक्ती' या विषयावर प्रबोधन केले. तसेच, चंद्रपूर वाहतूक शाखेचे प्रविण सोनोने यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले.
केवळ व्याख्यानेच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाचा संदेश दिला. श्रमसंस्काराद्वारे श्री. साईनाथ विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता करण्यात आली. पथनाट्य आणि रॅलीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) पथकाद्वारे आयोजित सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप नुकताच कढोली येथे उत्साहात संपन्न झाला. सात दिवसांच्या या कार्यकाळात स्वयंसेवकांनी आपल्या कार्यातून गावकऱ्यांची मने जिंकली, मात्र निरोप घेताना स्वयंसेवकांचे डोळे पानावले होते.
समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चानकुमार खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश हिंगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर आणि उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच शैलेश चटके, उपसरपंच सुषमा उरकुडे, साईनाथ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुमा मानुसमारे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चानकुमार खोब्रागडे यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.से.यो. विभागीय समन्वयक डॉ. कुलदिप आर. गोंड, कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार आणि डॉ. निखील देशमुख यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रा. सिद्धार्थ कांबळे आणि शिक्षकेतर कर्मचारी रुचिता टोकलवार, शशिकला पारधी, हनुमंतू ठंबारे, दशरथ कामतवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वरिष्ठ स्वयंसेवक इजाज शेख, मुबारक शेख, भैरव दिवसे, दर्शन मेश्राम, रोशन चौधरी, साहिल गायकवाड, गौरव झाडे, अनिकेत टेकाम, रोहित चिवंडे, आकाश मडावी, आनंद इंगोले, दिपक सिन्हा, शालिनी निर्मलकर यांनी चोख व्यवस्था सांभाळली. सात दिवस एकत्र राहिल्यामुळे आणि गावच्या प्रेमामुळे शिबिर सोडताना स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे डोळे पानावले होते. "हे शिबीर अजून काही दिवस चालायला हवे होते," अशीच भावना प्रत्येकाच्या मनात उमटत होती.





