Chandrapur police Bharati: खाकीच्या स्वप्नासाठी आलेल्या तरुणांना मदतीचा हात!

Bhairav Diwase
'शिवगड' कार्यालयात राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था
चंद्रपूर:- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही हजारो तरुण-तरुणी आपल्या खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून मैदानी चाचणीसाठी दाखल होत आहेत.


जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या या उमेदवारांना चंद्रपूर शहरात राहण्यासाठी आणि जेवणासाठी अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शिवसेना (उबाठा) नेते जयदीप प्रकाशराव रोडे यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.


चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेल्या पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी निशुल्क (मोफत) राहण्याची व सायंकाळी जेवणाची सोय करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या गरजू उमेदवारांना शहरात महागड्या लॉजवर राहणे परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन जयदीप रोडे यांनी आपल्या 'शिवगड' कार्यालयाचे दरवाजे उमेदवारांसाठी खुले केले आहेत.


सुविधा कुठे उपलब्ध आहे?
स्थळ: शिवगड कार्यालय, एस.टी. वर्कशॉप चौक, पंचवटी लॉन जवळ, तुकूम, चंद्रपूर.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी खालील समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

संतोष बराटे: 9049600555
सचिन मेंढे: 9028369444
व्यंकटेश श्रीकोटवार: 9763638609
चेतन कोरचे: 7020486281

या सामाजिक पुढाकारामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांना मोठा आधार मिळाला असून, सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.