Chandrapur accident News: भटाळा दर्शनावरून परत येताना शिवभक्तांचा वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शिवभक्तांचा दर्शनावरून परत येताना वाहन पलटी झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर १७ प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळील घडली. यापैकी १२ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पलटी झाले. यात भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.


सर्व जखमींना प्रथम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने १२ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघातातील जखमी चे नाव मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६) या १२ जणांचा समावेश असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी, गुरुवेश राजेश जाधव (१४), ओंकार शिवशंकर मांढरे (९), प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पाटाळा व राळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. माजरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.