Chandrapur News: ऐतिहासिक स्मृतींना उजाळा; बापूंच्या पाऊलखुणांनी पावन झालेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावर JCI कडून अभिवादन!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- २८ फेब्रुवारी १९३६... हा तो ऐतिहासिक दिवस, जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पाऊलखुणांनी चंद्रपूरची भूमी पावन झाली होती. सावली येथे आयोजित 'ग्रामोद्योग संघाच्या' वार्षिक अधिवेशनासाठी बापूंचे रेल्वेने चंद्रपूर स्थानकावर आगमन झाले होते. त्याकाळी बापूंना पाहण्यासाठी उसळलेला तो जनसागर आज पुन्हा एकदा आठवणींच्या रूपाने जिवंत झाला आहे.


या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज JCI चंद्रपूर (Junior Chamber International) यांच्या वतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील 'नमन स्थळ' येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या गौरवशाली क्षणी सरदार पटेल महाविद्यालयाचे स्वयंसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.