चंद्रपूर:- चंद्रपूर शहरा लगत असलेल्या इरई नदी पुलावरून कठडा तोडून कार नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्रौ घ्या सुमारास समोर आली आहे. चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदी पुलावरुण कोसळून अपघात झाला. कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. पाच ही जण गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने नदी पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.


