Chandrapur News : न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा न्यायालयाचीही सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली असून, न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना इमारतीबाहेर काढण्यात आले आहे.


दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले आहे.