इन्स्पायर अवार्ड मानक सन-2022 अंतर्गत वेदांत मडावी यांची राज्यस्तरीय निवड #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- इन्स्पायर अवार्ड मानक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शन करीता जिल्ह्यातील निवड पात्र 122 अवार्डी विद्यार्थ्यांपैकी 118 विद्यार्थ्यांनी मानक स्पर्धा ॲप यावर दिनांक 15/11/2022 ते 06/12/2022 पर्यंत प्रोटोटाइप अपलोड केले. त्याअनुषंगाने इन्स्पायर अवार्ड मानक जिल्हास्तरीय प्रदर्शनचे ऑनलाईन आयोजन दिनांक 29/12/2022 ते 30/12/2022 या कालावधीत करण्यात आले.

पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेचे इयत्ता आठवीतील विद्यार्थी वेदांत सुरेश मडावी यांची निवड राज्यस्तर करीता झालेली आहे. उपकरणाचे नाव रेल्वेमध्ये मोबाईल चॉजिंगसाठी स्मार्ट लॉकर हा प्रोजेक्ट वेदांत सुरेश मडावी यांनी तयार केला. मोबाईलला लॉकर असल्यामुळे चोरीला जाण्याची भिती राहणार नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासात रात्रीला निवांत झोप घेता येईल. रेल्वेमध्ये जिथे साकेट आहे, अशा कोणत्याही ठिकाणी मोबाईल चॉर्जिंग करता येईल. हलका असल्याने प्रवासात स्वतःजवळ बाळगण्यास सोपे आहे. या उपकरणाचे फायदे आहेत.

राज्यस्तरीय करीता निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक अरुण यामावार, मार्गदर्शक शिक्षक सतिश शिंगाडे (वि.शि.), आई-वडील, परीवार तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले. व शुभेच्छा दिले.

तसेच इन्स्पायर अवार्ड मानक सन-2022 राज्यस्तरीय प्रदर्शनची तारीख वरीष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत