चंद्रपूर:- तीन दिवसांपूर्वीच निरोप घेतलेल्या २०२२ सालात चंद्रपूरातील प्रदूषणात आणखी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची दैनंदिन २४ तासातील हवा गुणवत्ता निरीक्षणाची २०२२ या वर्षातील प्रदूषणाची आकडेवारीतून दिली आहे.
त्यामध्ये ३६५ दिवसांत चंद्रपूरमध्ये केवळ २९ दिवस आरोग्यदायी होते. ३३६ दिवस प्रदूषण राहिले आहे. यामध्ये १६४ दिवस कमी प्रदूषण, १५० दिवस जास्त प्रदूषण तर २२ दिवस आरोग्याकरीता अत्यंत हानिकारक राहिलेत. २०२१ च्या तुलनेत २०२२ चंद्रपूरकरच्या प्रदूषणात वाढ झाल्याने चंद्रपूरकरांची चिंता वाढली आहे.