पोंभूर्णा ईको पार्क म्हणतोय "आ अब लौट चले" #chandrapur #pombhurna
वनविभागाने सन २०१७ साली शासनाच्या नाविन्य पूर्ण फंडातून सुमारे ३ पथदिवे, सोबतच निसर्ग पायवाट व निसर्ग निर्वचन केंद्र हे कोरोना काळात इको पार्क बंद असल्यामुळे मेंटेनन्स होऊ शकलं नाही. ज्या वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती व मेंटेनन्सच्या निधीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. लवकर आम्ही येते काम सुरू करणार आहोत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्कच्या उद्घाटनानंतर त्याच्या देखभालीसाठी कोणतीही निधी आतापर्यंत प्राप्त झाली नाही. कोरोना काळात उद्यान बंद असल्यामूळे पर्यटकांकडून निधी गोळा होत नव्हता. त्यामुळे विद्युत बिल भरता आले नाही. MSEDC ने मीटर काढून नेले. वीज नसल्यामुळे झाडांना पाणी देता आले नाही. त्यामुळे पाणी नसल्यामुळे झाडे जगू शकली नाहीत आणि तिथली माती इतर सर्व प्रजातीसाठी योग्य नसल्यामुळे तिथली वेगवेगळ्या प्रजातीची बरीच झाडे जगू शकली नाहीत. बोरवेल बंद असल्यामुळे त्यात सुध्दा गाळ जमा होऊन ते पण खराब झालेत. आता तिथे बोरवेल ची गरज आहे. सदर जागेवर उधळीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे उधळीने लाकडांनी बनवलेली सगळे बेंचेस पगोडे आणि पूल नष्ट झाली आहेत. विद्युत कनेक्शन पुन्हा घेऊन, नवीन झाडे लावून त्यांना जगविणे, तिथे आता नवीन पूल, पॅगोडे इतर गोष्टींसाठी प्रस्ताव तयार करून निधीची मागणी करण्यात येत आहे. सध्या जी रक्कम पर्यटकांच्या माध्यमातून जमा झालेली आहे त्यातून काही किरकोळ कामे करून इको पार्कला थोड्याफार प्रमाणात चांगले रूप देता येईल त्याबाबत नियोजन करीत आहे. लवकरच इको पार्क आधीसारखे पर्यटकांचे एक आकर्षण बनेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फणिद्र गादेवार
वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभूर्णा
वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभूर्णा
इको पार्क चालविण्याचे काम आमच्या समीतीला जोडण्यात आले आहे. मात्र त्याचे मेंटेनन्स वनविभागाच्या वतीने करण्यात
देवराव कडते,
अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती चिंतलधाबा
देवराव कडते,
अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती चिंतलधाबा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत