धानोरा:- धानोरा तालुक्यातील टवेटोला येथील नागरिकांनी जंगली डुंबरसात्या खाऊन एकाच कुटूंबातील ५ नागरीकांना विषबाधा झाल्याची घटना २७ जून रोजी संध्याकाळी घडली. विषबाधीत व्यक्तीना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
प्राप्त माहितीनुसार धानोरा तालुक्यातील टवेटोला येथील नागरीकांनी दि. २७ जून रोजी जंगलातून डुंबरसात्या आणल्या. त्या स्वच्छ करून भाजी केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता सर्वांनी एकत्र मिळून जेवण केले. त्यानंतर काही वेळाने त्यांना हगवन व उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना दिनांक २८ जून रोजी सकाळी ८ वाजता धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
भरती रुग्णांमध्ये विद्या देवनाथ नैताम (३ वर्ष) रा. कनारटोला, अक्षर देवनाथ नैताम (१० वर्ष) रा. कनारटोला, सपना रामदास नैताम (१६ वर्ष) रा. टवेटोला, ललिता रामदास नैताम (४५) रा. टवेटोला, स्वप्नील रामदास नैताम (२६) रा. टवेटोला यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दिव्या व अक्षर हे नातेवाईक असलेल्या ललिता रामदास नैताम यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते.सध्या त्याची प्रकृती धोक्यात बाहेर असल्याचे कळते.