Chandrapur accident News: एका डुलकीने घात केला! भीषण अपघातात ४ महिलांचा मृत्यू

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चालकाच्या एका डुलकीने चार कुटुंबांचा आधार हिरावला आहे. नागपूरहून तेलंगणातील आसिफाबादकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीला राजुरा तालुक्यात भीषण अपघात झाला. सोंडो आणि सिद्धेश्वर दरम्यानच्या महामार्गावर, रात्री २ वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट नाल्यावरील पुलावर आदळली.


 हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला. यात अफजल बेगम (५५ वर्ष), सायरा बानो (४५ वर्ष), सबरीन शेख (१३ वर्ष), सलमा बेगम झाकीर हुसेन (४६ वर्ष) या चारही जणींना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.


या दुर्घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये शाहीन निशा, नजत बेगम, नुसरत बेगम आणि चिमुकल्या अब्दुल अरहानचा समावेश आहे. सुदैवाने चालक अब्दुल रहमान या अपघातात सुखरूप बचावला आहे.