Chandrapur News: चंद्रपूरच्या राम सेतूखाली आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शहरातील राम सेतू पुलाखाली आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६५ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून, तो सध्या चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.


अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, प्रथम दर्शनी या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे.


प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जर आपल्या पाहण्यात किंवा माहितीत कोणी बेपत्ता वृद्ध व्यक्ती असेल, ज्यांचे वर्णन या घटनेशी जुळते, तर कृपया त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा.