Chandrapur Fire News: चंद्रपुरात शासकीय रुग्णालय परिसरात आग; अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात आज अचानक आगीचे लोळ पाहायला मिळाले. रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या शासकीय रुग्णालय परिसरातील ही घटना आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा साचला होता. या कचऱ्याला आज अचानक आग लागली. ज्यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत कोणत्याही प्रकारचे जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे.