Chandrapur News: भाजपच्या दारावर 'भ्रष्टाचारी आणि ED-CBI ग्रस्त' लोकांसाठी पाटी लावा!

Bhairav Diwase
वडेट्टीवारांचा फडणवीसांना खोचक टोला
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक निकालांवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाची दारे कोणत्याही समाजासाठी किंवा व्यक्तीसाठी बंद नाहीत. पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्वांचे स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, फडणवीसांच्या या विधानाचा समाचार घेताना विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपने आता आपल्या दरवाजावर एक पाटीच लावली पाहिजे. ज्यांच्यावर ED, CBI आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्यांनाच केवळ भाजपमध्ये प्रवेश मिळेल, असं त्या पाटीवर लिहावं. अशी पाटी लावली आणि मग दरवाजा उघडा ठेवला, तरी पक्षाला नक्कीच 'मजबुती' मिळेल.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर वडेट्टीवार कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी थेट भाजपच्या 'वॉशिंग मशीन' राजकारणावर निशाणा साधला आहे.