पोंभुर्णा:- भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत २७ मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी मुंबई येथे झालेल्या एका विशेष बैठकीत निश्चित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीची अध्यक्षता भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी केली.
या बैठकीला प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, रविंद्रजी अनासपुरे, श्री. रणधीरजी सावरकर, श्री. राजेश पांडे, श्री. विजयराव चौधरी, माधवीताई नाईक तसेच विदर्भ संगठन मंत्री श्री. उपेंद्रजी कोठेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आज या नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली. या घोषणेनुसार, पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदी आष्टा येथील हरीष ढवस यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर बोलताना, हरीश शर्मा यांनी विश्वास व्यक्त केला की, पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही नवीन टीम अत्यंत जोमाने आणि कार्यक्षमतेने काम करेल. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला अधिक बळकट करण्यासाठी ही नवीन मंडळ कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.