Chandrapur News: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सत्तासंघर्ष!

Bhairav Diwase
कॉंगेसचे भाजपला कडवे आव्हान, कोण मारणार बाजी?
चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सलग साडेसात वर्षे बहुमतासह भाजपची सत्ता असलेल्या या गडाला काँग्रेसने कडवे आव्हान दिले आहे.


सत्ता राखण्यासाठी झगडणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार अशा दोन गटांत भाजप विखुरल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवर जोरगेवार गटाचे वर्चस्व असले तरी, हा संघर्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


दुसरीकडे, काँग्रेसमध्ये आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची मजबूत मुठ बांधली गेली आहे. मात्र, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने केलेली अजित पवार गट आणि शिंदे सेनेसोबतची युती, काँग्रेसच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष महाविकास आघाडीत एकत्र येऊन लढणार की स्वतंत्र, यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. त्यामुळे मतदार पुन्हा भाजपला संधी देणार की काँग्रेस आणि मित्रपक्ष बाजी मारणार, याचे उत्तर येत्या १६ जानेवारीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.