Character Certificate: चारित्र्य पडताळणीसाठी आता विलंब नाही; उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीसाठी 'स्पेशल सेल' कार्यान्वित

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणूक- २०२५ चे अनुषंगाने उमेदवारांचे चारित्रय सत्यापण प्रमाणपत्र पडताळणी करीता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे Character Certificate Cell ची स्थापना केलेली असुन सदर सेल चे प्रभारी अधिकारी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे (7709448298) यांची नेमणुक करण्यात आली आहे.


महानगर पालिका निवडणूक-२०२५ करीता उभे असलेले उमेदवारांना सदर निवडणुक संबंधाने चारित्रय सत्यापण प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठलीही अडचण असल्यास किंवा विलंब होत असल्यास, त्या उमेदवारांनी पोउपनि रोशन इरपाचे यांचेशी संपर्क साधावेत.

वेबसाइट :- https://pcs.mahaonline.gov.in