Fire News: चंद्रपूर जिल्ह्यात चालत्या डिझेल टँकरचा भीषण आग!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावर आज सायंकाळी एका धावत्या डिझेल व्हॅनला भीषण आग लागली आहे. ही घटना सायगाटा गावाजवळ घडली आहे.

आज दिनांक २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास एका डिझेल वाहून नेणाऱ्या व्हॅनला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच गाडीने रौद्र रूप धारण केले.