चंद्रपूर:- अलीकडेच चंद्रपूर महानगरपालिकेचे वातावरण तापायला सुरुवात झाली तर दुसरीकडे आम आदमी पार्टी ने दहा उमेदवाराची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. महाराष्ट्र प्रदेश जॉईंट सेक्रेटरी सुनिल मुसळे यांच्यातर्फे दहा उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली.
यामध्ये इंजिनीअर पत्रकार तसेच उच्च विद्याविभुशीत उमेदवाराचा समावेश आहे या प्रथम यादीमध्ये मयूर राईकवार (प्रभाग 8 ब )राजु कुडे (प्रभाग 13 ड ) योगेश गोखरे (प्रभाग 1 ड )जयदेव देवगडे (प्रभाग 17 अ )पुस्तकला संतोष बोपचे प्रभाग 3 क ) सुनिल रत्नाकर भोयर (प्रभाग 15 ब )तबसूम शेख (प्रभाग 11 क )इंजि.विनोद नगराळे (प्रभाग 10अ )सुनिल सदभय्या (प्रभाग 7 ड )प्रभाकर आवारी (प्रभाग 1 ब ) यांचा समावेश आहे.
आम आदमी पार्टी महानगरपालिका निवडणूक लोकांच्या मूलभूत मुद्द्यावर लढवत असल्याने जनतेनी सहकार्य करावे असे आवाहन सुनिल देवराव मुसळे जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र यांनी केले आहे.

