दारूविक्रीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
सावली:- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूविक्रीविरोधात पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काल, २५ जून २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा मेहा (बुज), गोसी खुर्द नहराजवळील रोडवर नाकाबंदी करण्यात आली.
या नाकाबंदीदरम्यान, एम.एच.२९-जे-०४४८ क्रमांकाची एक मारुती कार थांबवण्यात आली. पंचांसमक्ष या वाहनाची पाहणी केली असता, त्यात देशी दारूच्या ९० एम.एल.च्या एकूण २००० बाटल्या (२० बॉक्समध्ये) आढळून आल्या. पोलिसांनी अंदाजे ८०,००० रुपये किमतीची मारुती कार आणि ७०,००० रुपये किमतीची अवैध दारू असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी, रमेश राजू ताडपल्लीवार (वय ४२ वर्ष, रा. अंतरगाव टोला, ता. सावली, जि. चंद्रपूर) या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस स्टेशन पाथरीचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे, सहायक फौजदार यशवंत कोसमशिले, पोलीस अंमलदार बळीराम बारेकर, प्रवीण कोवे, अमित म्हस्के, गजेंद्र डेंगळे, खेलेश कोरे, आणि महिला पोलीस अंमलदार शोभना सुरे (सर्व पोस्टे पाथरी) यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.